ठळक बातम्या

जुन्या निवृत्तवेतन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक उद्यापासून संपावर

ठाणे जिल्ह्यातून सुमारे २० हजार कर्मचारी सहभागी

ठाणे दि.१३ :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तवेतन (पेन्शन) योजनेच्या मागणीसाठी उद्यापासून ( १४) संप पुकारला आहे. या संपात ठाणे जिल्ह्यातून सुमारे २० हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचे ठाणे जिल्हा जुनी निवृत्ती वेतन योजना संघटनेकडून सांगण्यात आले.

मुंबईत २८ ते ३० मार्च दरम्यान जी २० परिषदेची दुसरी बैठक

छत्तीसगढ, राजस्थान, पंजाब, हिमाचलप्रदेश अशा राज्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना स्वीकारली आहे. त्यामुळे राज्यातही ती योजना स्वीकारण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार

या मागणीसोबतच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करा, सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा, कंत्राटी कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करावी, निवृत्तीचे वय ६० करावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची सध्या रोखलेली पदोन्नती तत्काळ सुरू करावी, उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतन वाढीसाठी येण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरू करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करावे, अशा विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *