ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. १३ :- कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणा-या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाले आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली तर ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
