सामाजिक

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक वि. वि. करमरकर यांचे निधन

मुंबई, दि.०६ :-ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा संपादक आणि ज्येष्ठ क्रीडा समालोचक वि. वि. करमरकर यांचे आज सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मराठी दैनिकात क्रीडा विषयक बातम्यांना, विशेषतः देशी खेळांच्या बातम्यांना प्राधान्य देऊन त्यांचे सविस्तर वृत्तांकन करण्यात करमरकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाच्या पहिल्या चमूत करमरकर यांचा सहभाग होता. करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये

पण एमए करत त्यांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली आणि ती सुद्धा क्रीडा पत्रकाराची. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठ्या संख्येने असत. मात्र, मराठीत फारशा नसताना त्या आणून मराठी जगताला त्या वाचायला दिल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी आपली लेखणी सतत सुरू ठेवली. यासाठी त्यांना द्वा.भ.कर्णिक, गोविंद तळवलकर या ज्येष्ठ संपादकांचाही पाठिंबा मिळाला. दीर्घ सेवेनंतर ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. समाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरला.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक वि. वि. करमरकर यांचे निधन

क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. मराठी वृत्तपत्रांत खेळ या विषयासाठी रोज संपूर्ण पानं त्यांच्यामुळे सुरू झाले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यानी विविध खेळांचे धावते समालोचन केले. मराठी भाषा ओघवती आणि प्रभावी करायची असेल तर ती आधी सोपी असली पाहिजे, याचा त्यांचा आग्रह असायचा. अंधेरी येथे पारशीवाडा स्मशानभूमीत करमरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

करमरकर यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला. करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. वृत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *