पाकीटबंद उत्पादनातील पदार्थांमधील स्निग्ध पदार्थ प्राणीजन्य की वनस्पतीजन्य तपासण्याची यंत्रणा नाही
माहितीच्या अधिकारात धक्कादायक वास्तव उघड
ही यंत्रणा उभी करण्याची हिंदू विधीज्ञ परिषदेची मागणी
मुंबई दि.१६ :- पाकीटबंद किंवा अन्य बेकरी उत्पादनांमध्ये वापरले जाणारे ‘इमल्सीफायर्स’ (एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ) हे प्राणीजन्य की वनस्पतीजन्य आहेत हे तपासण्यासाठीची कोणतीही यंत्रणा राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे नाही, असे धक्कादायक वास्तव माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. अशी तपासणी करणारी यंत्रणा अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने उभी करावी, अशी मागणी हिंदू विधीज्ञ परिषदेने केली आहे. हिंदू विधिज्ञ परिषदेच्या अॅड्. मृणाल व्यवहारे यांनी मुंबई आणि नागपूर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करून याबाबत विचारणा केली होती.
रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येईल त्या अकरा दिवसांची यादी जाहीर
त्यावर अशी कोणतीही यंत्रणा नसल्याचे उत्तर देण्यात आले. अन्नपदार्थांतील घटकांचे वर्णन केवळ ई-कोडिंगच्या माध्यमातून न दर्शविता अन्नपदार्थ बनविताना त्यात वनस्पती किंवा प्राणी किंवा प्रयोगशाळेत तयार केलेल्या घटकांचा स्पष्ट उल्लेख प्रमाणासह असला पाहिजे. जेणेकरून लोकांना मांसाहार कि शाकाहार निवडण्याचा अधिकार राहिल. असे स्पष्ट आदेश डिसेंबर २०२१ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात ‘राम गौरक्षा दला’च्या चिप्समध्ये प्राण्यांच्या चरबीचे मिश्रण असल्याच्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायमूर्ती विपिन सांघी आणि जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने दिले होते.
मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
मागे नेस्लेच्या ‘मॅगी’मध्ये शिसे अधिक असल्याच्या वादानंतर ई-कोडिंग संदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ई-कोडिंगमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जातो किंवा लोकांना एखाद्या पदार्थाचे व्यसन लावण्यासाठी आरोग्याला हानीकारक पदार्थ मिश्रित केले जातात, असेही उघड झाले होते. हिंदु विधिज्ञ परिषद यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करत आहे एकीकडे मुसलमानांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी पाकिटबंद पदार्थांची निर्मिती करतांना धर्मश्रद्धांचे हनन होऊ नये, यासाठी ‘हलाल सर्टिफाइड’ असे चिन्हाद्वारे दर्शवले जाते. अशी बिगरसरकारी समांतर यंत्रणा देशात उभी राहिली आहे. हिंदू, जैन आणि गैरमुसलमानांच्या धर्मश्रद्धांचा मात्र याठिकाणी विचार होताना दिसत नाही, हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली.
आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा शिवजयंती उत्सव साजरा होणार
बेकरी उत्पादने उदाहरणार्थ बिस्किटे इत्यादी कुरकुरीत व्हावीत, म्हणून त्यामध्ये एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ घातले जातात. त्यांना ‘इमल्सीफायर्स’ म्हणतात. हे ‘इमल्सीफायर्स’ वनस्पतीजन्य किंवा प्राण्यांच्या चरबीपासूनही बनलेले असतात. या पदार्थांच्या पाकिटांवर लिहलेल्या ई-कोडिंगमध्ये E120, E322, E422, E 471, E542, E631, E901 आणि E904 मध्ये प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले ‘इमल्सीफायर्स’ असू शकतात.
बाजारातून नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बिस्किटे, चिप्स, सूप, चॉकलेट आदि बेकरी आणि पाकिटबंद पदार्थांच्या पाकिटांवरील ई-कोडिंग तपासा. पाकिटांवर हिरवे चिन्ह असूनही त्या पदार्थात मांसाहारी वा आरोग्यास हानीकारक घटक असू शकतात.