रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाई, म्हशींच्या अटकावासाठी कुंपणाचा अडथळा
पश्चिम रेल्वेवर कामाला सुरुवात, मध्य रेल्वेवर सर्वेक्षण
मुंबई दि.१६ :- रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाई, म्हशींच्या अटकावासाठी कुंपणाचा अडथळा उभारण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर कामाला सुरुवात झाली असून मध्य रेल्वेवर सर्वेक्षण करून हे काम केले जाणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला गुरांची धडक बसल्याने एक्स्प्रेसचे नुकसान झाले होते.
पाकीटबंद उत्पादनातील पदार्थांमधील स्निग्ध पदार्थ प्राणीजन्य की वनस्पतीजन्य तपासण्याची यंत्रणा नाही
अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पश्चिम रेल्वेने रेल्वे मार्गाच्या बाजूला पोलादी कुंपण घालण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबई ते गांधीनगर दरम्यान ६२३ किलोमीटर लांबीचे पोलादी कुंपण बांधण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २४५.२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येईल त्या अकरा दिवसांची यादी जाहीर
मध्य रेल्वेच्या मार्गावरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेकडूनही कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतदरम्यान पोलादी कुंपण उभारले जाणार असून त्यासाठी आधी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.