रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येईल त्या अकरा दिवसांची यादी जाहीर
मुंबई दि.१६ :- रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येईल अशा अकरा दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते.
मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
यात गणेशोत्सवातील तीन तर नवरात्रोत्सवातील दोन दिवसांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी ११ दिवसांची यादी जाहीर केली आहे.
आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा शिवजयंती उत्सव साजरा होणार
शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील तीन दिवस, नवरात्रोत्सवातील दोन दिवस, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस, ख्रिसमसनिमित्त २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर या दिवसांचा यादीत समावेश आहे.
कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिरासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशेष बससेवा
तर आणखी चार दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच २८ सप्टेंबर रोजी ईद – ए – मिलाद असून त्यासाठीही सवलत देण्यात आली आहे. मात्र चंद्र दर्शनानुसार हा दिवस ठरविण्यात येणार आहे.