ज्येष्ठ दक्षिणात्य अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन
वृत्तसंस्था
हैदराबाद दि.२३ :- ज्येष्ठ दक्षिणात्य अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन पुत्र आणि दोन कन्या असा परिवार आहे. कैकला सत्यनारायण यांच्या पार्थिवावर उद्या (२४ डिसेंबर) हैदराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९५९ यावर्षी प्रदर्शित झालेला ‘सिपाई कुटुरू’ हा कैकला यांचा पहिला चित्रपट होता. साडेसातशेहून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले होते. कैकला यांनी चित्रपटात विविध भूमिका केल्या असल्या तरी त्यांनी साकारलेली ‘यम’ ही भूमिका विशेष गाजली. मछलीपट्टणम या लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणूनही निवडून आले होते.
