नव्या वर्षांत कल्याण ते तळोजा मेट्रो १२ च्या कमाला सुरुवात
मुंबई दि.२१ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) नव्या वर्षात कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गिकेसह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
कल्याण ते तळोजा मार्गिका २०.७५ किलोमीटर लांबीची आहे. या मार्गिकेत कल्याण एपीएमसी, गणेश नगर (कल्याण), पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा (डोंबिवली पूर्व), हेदुतने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाक्लन, तुर्भे, पिसार्वे आगार, पिसार्वे आणि तळोजा अशी १८ मेट्रो स्थानके असणार आहेत.
या मार्गिकेच्या कामासाठी ४ हजार १३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता नव्या वर्षात या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो ५ मधील भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.