ठळक बातम्या

उत्तर प्रदेशातील मदरशात शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही

केंद्र सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.२८ :- उत्तर प्रदेशातील मदरशात शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या मदरशांमध्ये माध्यान्ह भोजन, पुस्तके मोफत दिली जातात. तसेच इतर गरजेच्या गोष्टीही पुरविल्या जातात. त्यामुळे शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे फक्त इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याच विद्यार्थ्यांचे अर्ज पुढे पाठवण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. गेल्यावर्षी सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला. यात १६ हजार ५५८ मदरशांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *