मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकक्षाकडून वर्षभरात १०० कोटी रुपयांची मदत
मुंबई दि.०५ :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत या वर्षभरात १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधानभवनातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात धर्मा सोनवणे यांना एक लाख रुपयांच्या वैद्यकीय मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
काही दिवसांपूर्वी मुंबईकडून ठाण्याला परतत असताना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ताफा थांबवून रुग्णाची विचारपूस केली..त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा सोनवणे यांना केवळ रुग्णवाहिकाच दिली नव्हती तर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार देखील केले होते.
‘महाडीबीटी’तर्फे मिळणारा लाभ नाकारण्यासाठी दोन महिन्यात व्यवस्था – उपमुख्यमंत्री अजित पवार
या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला. त्याचाच एक लाखांचा धनादेश काल सोनवणे यांना देण्यात आला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले. भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.