वाहतूक दळणवळण

मनसे वाहतूक सेनेतर्फे अनोखे आंदोलन

मुंबई दि.२७ :- शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द टी जंक्शन परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मासे आणि खेळण्यातील होड्या सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेने गुरुवारी आंदोलन केले.

लडाखच्या त्रिशुल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपयाची मदत

मानखुर्द – घाटकोपर आणि शीव – पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या मानखुर्द टी जंक्शन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. परिणामी, येते दररोजच वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर

खड्यांमधील खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकीच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही खड्डे बुजविले गेले नाहीत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात राज्यांतील खड्यांचा प्रश्न सोडविण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *