मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांची अंतिम मतदारयादी जाहीर

मुंबई, दि. २४
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्राचार्य, संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विभागप्रमुख या मतदारसंघांची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई विद्यापीठाने अलिकडेच नोंदणीकृत पदवीधरांची तात्पुरती मतदारयादी आणि अपात्र ठरलेल्या अर्जांची कारणासहित यादी जाहीर केली. यामध्ये ७२ हजार ६५८ अर्ज पात्र आणि तब्बल ४० हजार ६१३ अर्ज अपात्र ठरविण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in या संकेतस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ या लिंकवर किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर ‘वोटर लिस्ट’ या सदराखाली ‘क्लिक इअर फॉर फायनल वोटर लिस्ट’ या पर्यायावर क्लिक करून विविध प्रवर्गातील मतदारांना मतदारयाद्या पाहता येणार आहेत. सर्व मतदारांच्या भ्रमणध्वनीवर मतदारयादी प्रसिद्धी संदर्भातील संदेश पाठविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.