‘माझे स्थानक माझा अभिमान’ स्पर्धा
मुंबई दि.१० :- पश्चिम रेल्वे तर्फे ‘माझे स्थानक माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या ध्वनीचित्रफिती रेल्वे स्थानकात दाखवून प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे १२ हजार रुपयांचे बक्षीस श्रेयसी गुप्ता यांना मिळाले.
‘महावितरण’च्या कंत्राटी कामगारांचे लाक्षणिक उपोषण
तर रेल्वे फलाटांवर कचरा टाकू नये याबाबत जनजागृती करणाऱ्या रॅप गाण्याला दुसऱ्या क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. विवेकानंद इंगळे यांनी हे गाणे तयार केले आहे. अजय पाटील यांना या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. त्यांना पाच हजार रुपयांचा रोग पुरस्कार देण्यात आला.