करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज
मुंबई दि.११ :- बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वाढत असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये करोना संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मुखपट्टी लावावी, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे. करोना रूग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी काल एका बैठकीचे आयोजन केले होते.
पं. कुमार गंधर्व यांच्या गायनातून शाश्वत विचारधारेचे प्रकटीकरण – श्रुती सडोलीकर
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.
मुंबईतील मुद्रांक विक्रेते उद्या संप मागे घेणार
महापालिकेसोबतच खासगी रुग्णालयातही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने महापालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करावी, करोना चाचण्यांची संख्या वाढवावी, सर्व रूग्णालयांच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय प्राणवायू निर्मिती (ऑक्सिजन प्लांट) संच, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे. मुंबईतील महापालिका आणि खासगी रुग्णालयांनी करोना पूर्वसज्जतेचा भाग म्हणून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करावी अशा सूचनाही चहल यांनी या बैठकीत केल्या.
