पं. कुमार गंधर्व यांच्या गायनातून शाश्वत विचारधारेचे प्रकटीकरण – श्रुती सडोलीकर

मुंबई दि.१० :- ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायन पं. कुमार गंधर्व यांच्या गायनातून त्यांची शाश्वत विचारधारा प्रकट व्हायची, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर यांनी काल येथे केले. पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठान, एनसीपी आणि पंचम निषाद यांच्या संयुक्त विद्यमाने नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’च्या प्रायोगिक नाट्यगृहामध्ये ‘कालजयी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सडोलीकर बोलत होत्या.

मुंबईतील मुद्रांक विक्रेते उद्या संप मागे घेणार

पं. कुमार गंधर्व यांच्या गाण्यात एक अचंबित करणारा घटक होता. यामुळे लोकांना धक्का बसायचा पण तीच त्यांच्या गाण्याची ताकद होती, असे स्पष्ट करून सडोलीकर म्हणाल्या, कुमार गंधर्व यांनी अनेक पारंपरिक राग गायले मात्र हे करताना त्यांनी या रागांना पैलू पाडले, त्या रागाची वेगळी अंगे सादर केली. ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक प. सत्यशील देशपांडे यांनी गाणी, राग,सराव आणि मैफलीतून जे कुमार गंधर्व दिसले त्याची ओळख करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.