राजकीय

मतदार यादीतील सुधारणा (SIR) प्रक्रियेवरून राजकारण तापले, भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल : विनोद तावडे म्हणाले – ‘काँग्रेससह विरोधकांचा दुटप्पीपणा उघड’

मतदार यादीतील सुधारणा (SIR) प्रक्रियेवरून मतदार यादीतील सुधारणा (SIR) प्रक्रियेवरून राजकारण तापले, भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल : विनोद तावडे म्हणाले – ‘काँग्रेससह विरोधकांचा दुटप्पीपणा उघड’

नवी दिल्ली – मतदार यादी अधिक पारदर्शक आणि बनावट नावांपासून मुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेली ‘विशेष सघन पुनरिक्षण’ (SIR) प्रक्रिया आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार आणि उत्तर प्रदेश प्रभारी विनोद तावडे यांनी सोशल मीडियावर एक इन्फोग्राफिक शेअर करत काँग्रेससह संपूर्ण विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देश तोडण्याचा काँग्रेसचा कट उघड, घटनात्मक संस्थांवर हल्ला करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न – विनोद तावडे

विरोधकांची भूमिका पूर्णपणे दुटप्पी आणि ढोंगी असल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे.

‘कालपर्यंत बनावट मतदार हटवण्याची मागणी, आज स्वच्छता मोहिमेलाच विरोध’

विनोद तावडे म्हणाले की, कालपर्यंत जे विरोधी पक्ष मतदार यादीत बनावट आणि डुप्लिकेट नावे असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला जाब विचारत होते, आज जेव्हा तोच आयोग SIR च्या माध्यमातून यादी दुरुस्त करत आहे, तेव्हा तेच पक्ष त्याला विरोध करत आहेत.

त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरला “THE GREAT ELECTORAL U-TURN” असे नाव दिले असून, त्यात विरोधी नेत्यांच्या जुन्या दाव्यांची आणि आताच्या भूमिकेची तुलना करण्यात आली आहे.

इन्फोग्राफिकमधील 4 प्रमुख मुद्दे :

1. अभिषेक मनु सिंघवी (काँग्रेस) :
तेव्हा (2018) म्हणाले होते – आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सुमारे 50 लाख डुप्लिकेट मतदार आहेत.
आता – SIR अंतर्गत आंध्र प्रदेशात (44.28 लाख) आणि तेलंगणात (73.39 लाख) बनावट नावे हटवण्याच्या कारवाईला आणि नोटिसांना विरोध करत आहेत.

2. राहुल गांधी (काँग्रेस) :
तेव्हा (2025) आरोप केला होता – महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख बनावट मतदार जोडले गेले.
आता – निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

3. जवाहर सरकार (TMC) :
तेव्हा दावा केला होता – पश्चिम बंगालच्या मतदार यादीत लाखो बनावट मतदार आहेत.
आता – SIR अंतर्गत अवैध नावे हटवण्यावर आक्षेप घेत आहेत.

4. रमेश चेन्निथला (काँग्रेस) :
तेव्हा (2021) केरळमध्ये 4.34 लाख बनावट मतदार असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
आता – केरळमध्ये 8.57 लाख असत्यापित नोंदी SIR द्वारे हटवण्याला विरोध करत आहेत.

दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही’; अजितदादांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट

पोस्टरच्या शेवटी भाजपने म्हटले आहे की, जेव्हा यादीत चुका असतात तेव्हा विरोधक म्हणतात “बनावट मतदारांच्या जोरावर निवडणुकीत घोळ होत आहे”, आणि जेव्हा निवडणूक आयोग यादी स्वच्छ करतो तेव्हा तोच विरोधक त्याला “राजकीय हल्ला आणि मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्याचे षडयंत्र” ठरवतो.

निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेच्या प्रयत्नात अडथळा आणून विरोधक आपले राजकीय अपयश लपवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.