धर्म संस्कृती

मीरा रोड घटनाक्रम आणि हिंदू समाजाचा आक्रमक सनदशीर प्रतिकार

गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यातील भाईंदर-मीरा रोड परिसरातील पूनम क्लस्टर या निवासी सोसायटीमध्ये घडलेली घटना ही केवळ दोन गटांतील स्थानिक किंवा तात्कालिक स्वरूपाचा वाद नाही.

हा वाद मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर संघर्षात रूपांतरित झालेला आहे. निवासी संकुलाच्या सामायिक जागेत बेकायदेशीरपणे बकरे आणून त्यांची कत्तल करण्याच्या हट्टाला स्थानिक हिंदू रहिवाशांनी घेतलेल्या आक्षेपाला, केलेल्या कायदेशीर आणि शांततापूर्ण विरोधाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न आहे.

या संघर्षाच्या निमित्त देशातील नागरी कायदे, सार्वजनिक आरोग्य, बहुसंख्याक हिंदू समाजाच्या धार्मिक भावना आणि सर्वसमावेशकतेच्या नावाखाली चालणारा दुटप्पीपणा यावर पुन्हा सखोल चर्चा होणे गरजेचे आहे.

निवासी क्षेत्रातील तणाव

मीरा रोड येथील पूनम क्लस्टर या हाऊसिंग सोसायटीमध्ये ईदसाठी मोठ्या संख्येने बकरे आणून ठेवण्यात आले होते. निवासी इमारतींच्या आवारात उघड्यावर प्राण्यांची कत्तल करण्यास स्थानिक हिंदू रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला. हा आक्षेप पूर्णपणे नागरी नियम आणि आरोग्याच्या कारणास्तव होता.

हिंसा आणि प्राणघातक हल्ला

वाद केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही. वृत्तानुसार, सोसायटी आवारात बेकायदेशीरपणे बकरे आणण्याला आणि कत्तलीला विरोध करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर काही धर्मांध घटकांकडून धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हिंसक कृत्यात एका हिंदू कार्यकर्त्याच्या हाताचा पंजा कापला गेला, तर अन्य काही रहिवासी गंभीर जखमी झाले.

हिंदू समाजाची सूचक आणि आक्रमक प्रतिक्रिया

या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी थेट आंदोलनस्थळी डुक्कर घेऊन पोहोचले. तिथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले. ही प्रतिक्रिया ‘जशास तसे’ उत्तर देणारी असली, तरी ती हिंदू समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाल्यावर व्यक्त झालेली एक तीव्र कायदेशीर आणि वैचारिक कृती होती.

हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वीचे अपहरण करून तिला पाताळात लपवले होते. त्यावेळी श्रीविष्णूने वराह रूप घेऊन पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर घेऊन वर काढले होते. “दाढे धरुनि पृथ्वी नेतां वराहरुप होसी” । कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कट्टरतावादी मानसिकतेला तडाखा देण्यासाठी डुक्कर प्रभावी पर्याय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तीच नेमकी कृती केली आहे.

कुर्बानी हा मूलभूत घटनात्मक हक्क नाही सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक दाखले

भारतीय संविधानाचे अनुच्छेद २५ (Article 25) प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य देते; परंतु हे स्वातंत्र्य अनिर्बंध नाही. या अधिकारावर सार्वजनिक सुव्यवस्था, सामाजिक नैतिकता आणि आरोग्य’ (Public Order, Morality, and Health) यांचे स्पष्ट कायदेशीर निर्बंध आहेत.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात वेळोवेळी अत्यंत दिशादर्शक निवाडे दिले आहेत. मोहम्मद हनीफ कुरेशी वि. बिहार राज्य’ (१९५८) सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने (Constitutional Bench) अत्यंत स्पष्ट शब्दांत नमूद केले होते की, बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची कत्तल किंवा कुर्बानी देणे हा इस्लामचा ‘अत्यावश्यक धार्मिक भाग’ (Essential Religious Practice) नाही.

ती केवळ एक पारंपारिक समजूत किंवा सामाजिक पद्धत आहे. राज्य वि. मिर्झापूर मोती कुरेशी कसाब जमात’ (२००५): सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि नागरी सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका) प्राण्यांच्या कत्तलीवर, वाहतुकीवर आणि त्यांच्या विक्रीवर पूर्णपणे कायदेशीर निर्बंध किंवा बंदी लादू शकतात.

या कायदेशीर पार्श्वभूमीचा विचार करता, निवासी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये किंवा हिंदू बहुल रहिवासी भागात बकरे आणून तिथल्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हा कोणत्याही प्रकारचा घटनात्मक किंवा धार्मिक अधिकार ठरू शकत नाही.

छद्म-पर्यावरणवाद आणि सेक्युलर दुटप्पीपणा

देशात सण आणि पर्यावरणाच्या नावाखाली एका विशिष्ट प्रकारची वैचारिक दांभिकता (Hypocrisy) जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. दरवर्षी दिवाळीत तथाकथित पुरोगामी, सेक्युलर आणि पर्यावरणवादी गट फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणावर न्यायालयाचे उंबरठे झिजवतात. हिंदूंना होळीच्या पाण्याचे, महाशिवरात्रीच्या दुधाचे आणि गणेशोत्सवाच्या मूर्ती विसर्जनाचे वैज्ञानिक दुष्परिणाम शिकवले जातात.

याउलट, जेव्हा बकरी ईदच्या दिवशी लाखो मुक्या प्राण्यांची निवासी भागात किंवा उघड्यावर कत्तल केली जाते, नाल्यांमधून रक्ताचे पाट वाहतात आणि जैविक कचरा (Bio-waste) उघड्यावर टाकून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो, तेव्हा हेच पर्यावरणवादी सोयीस्कर मौन बाळगतात.

जर दिवाळीतील फटाके प्रदूषण करत असतील, तर निवासी वस्तीत शेकडो प्राण्यांच्या कत्तलीमुळे पसरणारी अस्वच्छता, हवेतील घातक जंतू आणि दुर्गंधी पर्यावरणाला पूरक कशी असू शकते? हा दुटप्पीपणा आहे. हिंदू समाजाने आता या वैचारिक दांभिकतेविरुद्ध सनदशीर आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नागरी कायदे, नियम आणि सार्वजनिक आरोग्याची पायमल्ली

भारतीय नागरी कायद्यानुसार निवासी क्षेत्रात (Residential Areas) याप्रकारे प्राण्यांची कत्तल करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. ‘दि प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट, १९६०’ (Prevention of Cruelty to Animals Act, 1960) आणि ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा’ (FSSAI) यानुसार कोणत्याही प्राण्याची कत्तल केली जात असल्यास ती केवळ आणि केवळ स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत कत्तलखान्यातच (Licensed Slaughterhouse) केली जाऊ शकते. हनिर्माण सोसायट्या, अपार्टमेंट्स, पार्किंग लॉट्स, गच्ची किंवा सार्वजनिक रस्त्यांवर प्राण्यांची खरेदी-विक्री करणे आणि त्यांना कापणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

आरोग्याचा गंभीर धोका आणि स्वच्छता नियम

कत्तल केलेल्या प्राण्यांचे अवशेष, जसे की कातडे, रक्त आणि अंतर्गत अवयव जर सोसायट्यांच्या कचराकुंडीत किंवा उघड्या वाहिन्यांमध्ये टाकले गेले, तर त्यातून कॉलरा, टायफॉइड आणि इतर अत्यंत घातक संसर्गजन्य आजार पसरतात. लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण राहतात अशा सोसायट्यांमध्ये हा सार्वजनिक आरोग्याशी चाललेला क्रूर खेळ आहे.

नियम अत्यंत कठोर असायला हवा की, ज्यांनी कत्तल केली आहे, त्यांनी ती जागा संपूर्णपणे निर्जंतुक (Sanitize) करून पूर्ववत स्वच्छ केली पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

डुक्कर निषिद्ध मग हिंदू भावनांचे काय ?

मीरा रोडच्या घटनेत आंदोलकांनी विचारलेला प्रश्न अत्यंत तार्किक आणि डोळे उघडणारा आहे. जर एका विशिष्ट समुदायाच्या श्रद्धेनुसार काही प्राणी पवित्र किंवा काही प्राणी निषिद्ध ठरतात आणि हिंदू समाजाने नेहमीच बहुसांस्कृतिकतेचा मान राखून त्यांच्या या भावनांचा आदर केला आहे; तर मग हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर का केला जात नाही? हिंदू समाज हा मूळचा निसर्गपूजक आणि प्राणीमात्र पूजक आहे.

तो गाय, बैल, वृक्ष, नदी आणि एकूणच चराचरात परमेश्वर पाहणारा समाज आहे. अशा हिंदू बहुल सोसायट्यांमध्ये, रहिवाशांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या डोळ्यांदेखत प्राण्यांचा गळा चिरणे हा हिंदूंच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांवर केलेला थेट आघात आहे. जर सोसायट्यांमध्ये बकऱ्यांना आणण्याची परवानगी कायद्याचे उल्लंघन करून दिली जात असेल, तर मग दुसऱ्या समुदायाने तिथे डुक्कर आणण्याला आक्षेप का घेतला जातो? हाच तो धार्मिक वर्चस्ववाद आहे, ज्याला हिंदू समाजाने आता जशास तसे वैचारिक उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

कडक कायद्याची अंमलबजावणी आवश्यक

हा प्रश्न केवळ तात्पुरती शांतता प्रस्थापित करून सुटणारा नाही. यासाठी शासनाने आणि प्रशासनाने कायमस्वरूपी कायदेशीर तरतुदी करणे गरजेचे आहे. हिंदू बहुल किंवा संमिश्र गृहनिर्माण सोसायट्या, अपार्टमेंट्स आणि निवासी संकुलांमध्ये व्यावसायिक किंवा धार्मिक कारणासाठी जिवंत प्राणी आणणे, त्यांचे अनधिकृत बाजार भरणे आणि कत्तल करणे यावर कायद्याने पूर्ण बंदी असावी.साजरीकारणासाठी अधिकृत जागांची सक्ती केली पाहिजे सण साजरा करताना महानगरपालिकेने केवळ अधिकृत कत्तलखाने (Slaughterhouses) किंवा शहराच्या वस्तीपासून दूर निश्चित केलेल्या जागेचा वापर बंधनकारक करावा.

अस्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमांची कठोर अमंलबजावणी गरजेची आहे. कत्तल झालेल्या जागेची संपूर्ण स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि निर्जंतुकीकरण करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तींची असावी. हलगर्जीपणा केल्यास मोठ्या दंडाची आणि ‘जामीनपात्र नसलेल्या’ (Non-bailable) शिक्षेची तरतूद असावी.सार्वजनिक सुरक्षा व आचारसंहिता सणाच्या नावाखाली निवासी भागात किंवा रस्त्यांवर होणारा ‘उन्माद’ थांबवून, सर्व सण शांततेत आणि इतर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना धक्का न लावता साजरे व्हावेत, यासाठी कडक नियमावली असावी.

सकारात्मक आक्रमकता आणि हिंदू व्यापकता

हिंदू समाजाचा उदारमतवाद, सहिष्णुता आणि कायदेप्रियता ही त्यांची ताकद आहे, कमजोरी नाही. कोणत्याही धर्माच्या सणाचा आदर करणे ही संस्कृती आहे, पण त्या आदराची किंमत हिंदूंच्या आरोग्याची हानी, त्यांच्यावर होणारे प्राणघातक हल्ले आणि त्यांच्या धार्मिक भावनांचा अपमान ही असू शकत नाही.

हिंदू समाज हा प्रतिक्रियावादी नाही, तर तो मुळात मानवतावादी आहे. परंतु, जेव्हा त्याच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन कायद्याचे उल्लंघन केले जाते, तेव्हा आत्मसन्मानासाठी उभे राहणे ही काळाची आहे.

मिरा-भाईंदरचे बजरंग दलाचे जिल्हा मंत्री नागनाथ कांबळे आणि शहराध्यक्ष पवन ठाकूर यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा स्पष्ट करतो की, हा लढा केवळ सणाचा पुरता मर्यादित नसून, कायदा धाब्यावर बसवून दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या हिंदू विरोधी मानसिकतेचे दर्शन घडवणारा आहे. प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता, मीरा रोडसारख्या घटनांमधून धडा घेऊन अन्यायग्रस्त हिंदू रहिवाशांना संपूर्ण कायदेशीर संरक्षण दिले पाहिजे.

बेकायदेशीर कत्तलींवर आणि निवासी भागातील प्राण्यांच्या बाजारांवर कायमची बंदी घालणारा कडक नियम लागू करणे हेच समाजस्वास्थ्यासाठी आणि सामाजिक शांततेसाठी हिताचे आहे. हिंदू समाज जागा होत आहे आणि तो आपल्या न्याय्य हक्कांसाठी कायदेशीर, विधायक आणि सकारात्मक आक्रमकतेने लढण्यास सज्ज आहे, हाच या घटनेचा संदेश आहे.

हिंदू बहुलतेत विकासाची हमी

राज्यात दावोस अजेंडा यशस्वी करायचा असेलतर, मुंबईसह संपूर्ण राज्य हिंदू बहुल राहिल याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एमएमआरडीए क्षेत्र राज्याचे ग्रोथ इंजिन होण्यासाठी तेथील हिंदू सुरक्षित असणे आवश्यक आहे.

औद्योगिक शांतता, सामाजिक स्थैर्य यासाठी सर्वसामान्य हिंदूंच्या हिताची जोपासना गरजेची आहे. पुरोगामित्व, सेक्युलॅरिझम, वोकिझम, लिबरल्स, न्यू-लेफ्ट यांचा अजेंडा मुस्लिमांच्या प्रबोधनाचा, सुधारणेचा नसून तो; मुस्लिमांना अधिक आक्रमक करणारा, संविधान नाकारून शरियानुसार यासाठी फूस लावणारा आणि आधी बकऱ्यांचे रक्त मग, हिंदूंचे रक्त यातून अराजकतेला चालना देणारा आहे.

हॉंगकॉंग, सिंगापूर पेक्षा अधिक सक्षम आर्थिक-व्यापार केंद्र म्हणून मुंबई विकसित करायची असेलतर, मूळ प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे. मूळ प्रश्न हिंदू- मुस्लिम नसून, मुस्लिम आहे. आणि त्या जोडीला पुरोगामी.सेक्युलर, वोक, लिबरल, न्यू-लेफ्ट आहे. यासाठी डुकराचा प्रतिकात्मक उपाय लक्षात घेतला पाहिजे. त्याच अर्थ समजून घेतला तर रोगावर उपचार करता येईल. अन्यथा, मिरा रोड येथील परिस्थिती अधिक गंभीर होईल.

***
साभार – मकरंद मुळे©
पत्रकार, राजकीय-सामाजिक विश्लेषक, विविध विचारांचे अभ्यासक