ठळक बातम्या

‘हिंसा आणि खेळ एकाच वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही!’ – हिंदु जनजागृती समितीची आक्रमक भूमिका

मुंबई: “ज्याप्रमाणे पाकिस्तानसोबत ‘पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही’ अशी भूमिका भारत सरकारने घेतली होती, तशीच कठोर भूमिका आता बांगलादेशच्या संदर्भातही घेण्याची वेळ आली आहे,” असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या आणि अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशी खेळाडूंना भारतात खेळण्यास पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी समितीने केली असून अभिनेता शाहरुख खानच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.

वसईच्या शाळेत येशूच्या ‘चमत्कारांचे’ नाट्य; हिंदु जनजागृती समिती आक्रमक, गुन्हा नोंदवण्याची मागणी

बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत, पण शाहरुख खानवर टीका

आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू मुस्तफीजुर रहमान याला वगळण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला आहे. समितीने या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी ‘कोलकाता नाईट रायडर्स’चा संघमालक शाहरुख खान याने स्वतःहून ही भूमिका का घेतली नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

समितीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “शाहरुख खानला हिंदूंच्या जखमांपेक्षा आपला संघ, व्यवसाय आणि त्यातून मिळणारी कमाई अधिक महत्त्वाची वाटते. बांगलादेशी खेळाडूंना प्रोत्साहन देणे म्हणजे तिथल्या हिंदूंवरील हिंसेला अप्रत्यक्ष पाठबळ देणेच आहे.” या कारणास्तव शाहरुख खानने देशाची माफी मागावी, अशी मागणी समितीने लावून धरली आहे.

हलाल’च्या नावाखाली चालणारी समांतर व्यवस्था थांबवा! खासदार मेधा कुलकर्णी यांची थेट FSSAI कडे मागणी

समितीच्या प्रमुख मागण्या:

* खेळाडूंवर पूर्ण बंदी: पाकिस्तान आणि बांगलादेशच्या एकाही खेळाडूला भारतभूमीवर खेळू देऊ नये.

 * कठोर संदेश: ‘हिंसा आणि खेळ एकाच वेळी चालू शकत नाही’, असा स्पष्ट संदेश भारत सरकारने बांगलादेशला द्यावा.

 * घुसखोरांवर कारवाई: भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत असून, त्यांना तात्काळ शोधून मायदेशी हाकलून लावावे.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बीसीसीआय अध्यक्षांना अधिकृत निवेदन पाठवले आहे. बांगलादेशी घुसखोरांचा अमली पदार्थांचे रॅकेट, मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये मोठा सहभाग असल्याचेही समितीने निवेदनात नमूद केले आहे.

‘हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार थांबवा’ अशी आग्रही मागणी करत समितीने आपला विरोध अधिक तीव्र केला आहे.