ठळक बातम्या

मुंबईसह ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरात मुसळधार – मुंबईत उद्या सकाळी साडेआठवाजेपर्यंत अतिमुसळधार

ठाणे दि.२७ :- ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरात दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू असून ठाणे येथे वंदना चित्रपटगृह परिसर, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.

जुलै महिन्यातील पावसाच्या नव्या विक्रमाची नोंद

मुंबईत उद्या (शुक्रवारी) सकाळी साडेआठवाजेपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे लोकल उशिराने धावत आहेत.

मुंबई विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक नोंदणीकृत पदवीधरांची अंतिम मतदारयादी जाहीर

मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. डहाणू जव्हार नाशिक राज्य महामार्गावरील तसेच विक्रमगड मधील तलवाडा येथे महामार्ग पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातून विसर्ग सुरू असल्याने तलवाडासह परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग लगत असलेल्या दुकानांमध्येही पाणी शिरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *