ठळक बातम्या

मुंबई विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक नोंदणीकृत पदवीधरांची अंतिम मतदारयादी जाहीर

मुंबई दि.२७ :- मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विद्यापीठ प्रशासनाने आज नोंदणीकृत पदवीधरांची अंतिम मतदारयादी जाहीर केली.

मनसे वाहतूक सेनेतर्फे अनोखे आंदोलन

अंतिम मतदारयादीनुसार ९४ हजार ६३१ पदवीधरांचे अर्ज पात्र तर १८ हजार ६४० अर्ज अपात्र ठरले आहेत. चुकीच्या पद्धतीने पदवी प्रमाणपत्र व छायाचित्र जोडणे, वैयक्तिक माहितीमध्ये चुका आणि विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे सदर नोंदणीकृत पदवीधरांच्या अंतिम मतदारयादीत १८ हजार ६४० अर्ज अपात्र ठरले आहेत.

लडाखच्या त्रिशुल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपयाची मदत

अपात्र अर्ज ठरलेल्या या सर्व नोंदणीकृत पदवीधरांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची पुन्हा संधी मिळणार नाही. यंदा त्यांना मतदानाला मुकावे लागणार आहे. नोंदणीकृत पदवीधरांना अंतिम मतदारयादीतील पात्र अर्जांची यादी या https://mu.eduapp.co.in/Approved3.aspx आणि अपात्र अर्जांची यादी https://mu.eduapp.co.in/Rejected3.aspx या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *