राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्या विरोधातच- जयंत पाटील
मुंबई, दि. १७
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप शिवसेना यांच्या विरोधातच आहे. आमचे सर्व आमदार आज अधिवेशनावेळी विरोधी पक्षांबरोबरच बसले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
अजित पवार आणि शरद पवार यांचे मनोमीलन व्हावे- केसरकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आठ मंत्र्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीसहून अधिक आमदारांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
Maharashtra: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील बोलत होते. काल नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांना जी विनंती केली होती, तीच विनंती आज पुन्हा एकदा त्यांनी पवार यांच्याकडे केली. शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकून घेतली, असेही पाटील म्हणाले.
राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका याआधी स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांना रोज कोणीतरी भेटल्यावर त्यांनी आपली भूमिका नव्याने स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही, असेही पाटील म्हणाले.
