अजित पवार आणि शरद पवार यांचे मनोमीलन व्हावे- केसरकर
मुंबई, दि. १७
अजित पवार आणि शरद पवार यांचे मनोमीलन व्हावे म्हणून आम्हीही प्रार्थना करु, असे शिवसेना नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.
Maharashtra: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेत्यांनी आजही शरद पवार यांची भेट घेतली. सलग दोन दिवस भेटीगाठी सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी वरील वक्तव्य केले.
अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी
शरद पवार यांच्याकडे सगळ्यांनी आग्रह धरला तर निश्चितपणे ते कदाचित तयार होऊ शकतील. मात्र इतक्या मोठ्या माणसाच्या मनात काय? हे सांगता येत नाही, असेही केसरकर म्हणाले.
