ठळक बातम्या

मध्य रेल्वेतर्फे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबई, दि. १६
मध्य रेल्वे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करत असून मोकळ्या आणि वापरात नसलेल्या २ हजार ६९४ किलोमीटर जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात निर्माण सौरऊर्जेचा वापर रेल्वे परिसरातील विजेचे दिवे, पंखे व इतर लहान उपकरणासाठी करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे डिझेल लोको इंजिन कमी करून विद्युत लोको इंजिन वापरावर भर दिला जात आहे. मध्य रेल्वेच्या पाच विभागातील रेल्वे स्थानकांतील, रेल्वे कार्यशाळेतील विजेच्या वापरावरील खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेने ८१ ठिकाणी एक मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी कंत्राट दिले असून या प्रकल्पातून रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत आणखी वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *