कल्याण- तळोजा प्रस्तावित मेट्रो बेलापूर-पेंधर या मार्गिकेशी जोडणार
कल्याण, दि. ११
कल्याण-डोंबिवली-तळोजादरम्यान प्रस्तावित ‘मेट्रो १२’ मार्गिकेला नवी मुंबईतील बेलापूर-पेंधर या मार्गिकेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे.
नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना जोडण्यासाठी एमएमआरडीएने ‘कल्याण-डोंबिवली-तळोजा’ ही ‘मेट्रो १२’ मार्गिका आखली आहे.
२०.७५ किमी लांबीच्या आणि १८ स्थानकांचा समावेश असलेल्या मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार होते.
अंदाजे ५,८६५ रुपये इतक्या खर्चाच्या या कामासाठी १९ निविदा सादर झाल्या होत्या. पण आता ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आल्या आहेत. नव्या विस्तारीत मार्गिकेचे पुन्हा आरेखन करून बांधकामासाठी नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत.
—-
