वीर ते खेड रेल्वे स्थानकांदरम्यान ७ जुलैला मेगाब्लॉक
मुंबई, दि. ५
कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकांदरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी येत्या ७ जुलै रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
दुपारी १२.२० ते दुपारी ३.२० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी ६ जुलै रोजी सुटणारी २०९१०पोरबंदर – कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा – वीर स्थानकांदरम्यान
१ तास ५० मिनिटे थांबविण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ तिरुवनंतपुरम -निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी – खेड स्थानकांदरम्यान ३० मिनिटे थांबविण्यात येणार आहे.
७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ तिरूअनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा ते वीर दरम्यान ३५ मिनिटे तर ७ जुलै रोजी सुटणारी १०१०६ सावंतवाडी – दिवा पॅसेंजर रत्नागिरी – खेड विभागात १ तास ५ मिनिटे थांबविण्यात येणार आहे.
——-
