वाहतूक दळणवळण

मेट्रो स्थानकात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्रे

मुंबई, दि. ४
महिला प्रवाशांचे आरोग्य, स्वच्छतेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळातर्फे (एमएमएमओसीएल) मेट्रोच्या दहिसर ते अंधेरी आणि दहिसर ते गुंदवली) मार्गिकावरील काही स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र बसविण्यात आली आहेत.

बोरिवली, कांदिवली, आकुर्ली, गुंदवली आणि दहिसर मेट्रो स्थानकांमध्ये स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्रे बसविण्यात आली आहेत. गरजेनुसार यंत्रांची संख्या वाढविण्यात येणार असून इतरही स्थानकांमध्येही ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *