ठळक बातम्या

अखेर मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल; रत्नागिरीत हलक्या सरी

मुंबई, दि. ११
अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून मोसमी पाऊस आज (रविवारी) दुपारी राज्यात दाखल झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीत मोसमी पाऊस दाखल झाला असून, हलक्या सरी सुरू झाल्या आहेत.

मोसमी पाऊस राज्यात ७ जून या दिवशी दाखल होतो.‌ यंदा केरळमध्येच मोसमी पाऊस उशिराने म्हणजे ७ जून रोजी दाखल झाला. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर सात ते आठ दिवसांनी पाऊस राज्यात दाखल होतो. यंदा केरळमध्ये दाखल झाल्यानंतर केवळ चारच दिवसांत मोसमी पाऊस राज्यात दाखल झाला आहे. आता ठाणे, मुंबईत मोसमी पाऊस कधी दाखल होईल याकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *