ठाणे, कल्याण आणि पालघर मतदार संघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील- आमदार संजय केळकर
ठाणे, दि. ११
ठाणे, कल्याण आणि पालघर हे मतदार संघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील, असा दावा आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे येथे केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी ठाणे लोकसभा मतदार संघात एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यावेळीउपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. मात्र अशा फुकटच्या वलग्नाह करण्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या योजना राबवा, असा टोला केळकर यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता लगाविला.
तर ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असून या ठिकाणी भाजपची संघटनात्मक ताकद खूप मोठी आहे,असे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
