पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई” पर्यटन धोरण राबविणार
मुंबई दि ३० :- महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यास मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यासही मान्यता देण्यात आली.
कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता
हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या विविध योजनांशी समन्वय साधून राबविण्यात येईल. याकरीता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या १० पर्यटन व्यवसायांना (होमस्टे, हॉटेल / रेस्टॉरंट, टूर ॲन्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे.
मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा ‘मावळा-टिबीएम’ यंत्राने पूर्ण
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या १ ते ८ मार्च या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स/युनिट्समध्ये सर्व महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. वर्षभरात एकूण ३० दिवस महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
