ठळक बातम्या

कामा रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी १५ एप्रिलपासून २४ तास सोनोग्राफी सुविधा

मुंबई दि.१३ :- कामा रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी येत्या १५ एप्रिलपासून २४ तास सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रसुतीसाठी अनेक महिला कामा रुग्णालयात येतात. गर्भवती महिलांना सोनाेग्राफी करणे आवश्यक असते. मात्र कामा रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीतच सोनोग्राफी करण्यात येत होती.

आगीचे संकट, चिमुकलीची सतर्कता आणि अग्निशमन दलाचे यशस्वी बचावकार्य

रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिलांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यास त्यांना सोनोग्राफी करण्यासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये जावे लागते आहे तर काही महिला खासगी केंद्रांवर जाऊन सोनोग्राफी करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महिलांसाठी २४ तास सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय कामा रुग्णालयाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *