स्वामिनी सावरकर यांचे निधन
पुणे दि.२१ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.
सरकारी सवलतीचा सकारात्मक विचार करून मिळालेल्या संधीचे सोने करा- प्रदीप पेशकार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्या त्या स्नुषा होत. स्वामिनी सावरकर यांचे ज्येष्ठ पुत्र पृथ्वीराज सावरकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.
वडाळा पूर्व येथील ‘बेस्ट’च्या विद्युत उपकेंद्राला आग
पती विक्रम सावरकर यांच्यासोबत त्यांनी ‘प्रज्वलंत’ वृत्तपत्राचे तसेच मुरबाड येथील महाराष्ट्र सैनिकी विद्यालयाचे कामही त्यांनी पाहिले, तेथे त्या कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर यांच्यासोबत राहत होत्या. गेल्या आठवड्यात स्वामिनी सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
