दहिसर पूर्व येथील आनंदवन उद्यानात महापालिकेतर्फे खुले वाचनालय
मुंबई दि.१३ :- दहिसर पूर्व येथील आनंदनगर परिसरात आनंदवन उद्यानात बृहन्मुंबई महापालिकेने ‘खुले वाचनालय’ सुरू केले आहे. ‘मिशन ग्रीन मुंबई’ यांच्या सहकार्याने हे खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
जुन्या निवृत्तवेतन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक उद्यापासून संपावर
खुल्या वाचनालयाच्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत विविध उद्यानात १९ खुली वाचनालये सुरू करण्यात आली असून त्यासाठी मुंबई प्रोजेक्ट, गोदरेज, मेघाश्रय अशा अनेक सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली आहे.
मुंबईत २८ ते ३० मार्च दरम्यान जी २० परिषदेची दुसरी बैठक
उद्यानात फिरायला येणारे नागरिक आपल्या आवडीची पुस्तके इथे येऊन वाचू शकतात तसेच शालेय विद्यार्थीही येथे अभ्यास करू शकतात.
