नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे ८० टक्के काम पूर्ण
ठाणे – बेसुमार पाणी वापराला आळा बसावा आणि पाणी वापराप्रमाणे देयकांची वसुली व्हावी या उद्देशातून शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम सुरू आहे. जलमापके बसविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
कडोंमपा हद्दीतील जुन्या तलावांचे सुशोभिकरण
नळजोडणीधारकांना यंदाच्या आर्थिक वर्षात जलमापकांच्या नोंदीप्रमाणेच देयक आकारले जाणार आहे. उर्वरित २० टक्के जलमापके बसविण्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.