खेळ

डोंबिवलीकर: श्रेयस गुरव याची मुंबई रणजी संघात निवड

डोंबिवलीतील जोशी हायस्कूलचा विद्यार्थी आणि सारस्वत कॉलनीचा रहिवासी असलेला श्रेयस गुरव याची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे.

चौथीत असल्यापासून डोंबिवलीकर क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे सरांच्या तालमीत श्रेयस क्रिकेट खेळू लागला आणि आता त्याने रणजी सारखा मोलाचा पल्ला गाठला आहे. श्रेयसच्या या यशात राजन धोत्रे सरांचा देखील मोलाचा वाटा आहे.

विशेष म्हणजे श्रेयस हा रणजी संघात निवड झालेला तिसरा डोंबिवलीकर आहे. निलेश कुलकर्णी आणि अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणे श्रेयस देखील लवकरच टीम इंडियामध्ये आपल्या दमदार खेळातून क्रिकेटप्रेमी डोंबिवली शहराचे प्रतिनिधित्व करेल, असा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.