गुन्हे-वृत

शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये महिला वकिलाचा विनयभंग, तरुणाला अटक

मुंबईतील एका शॉपिंग मॉलच्या महिला प्रसाधनगृहात ३५ वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

रमाशंकर पांडे असे या तरुणाचे नाव असून, तो शेजारच्या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.

आझाद मैदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील गंभीर बाब म्हणजे पीडित महिला वकिलाने तरुणाला विरोध केला असता रमाशंकर या तरुणाने महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळेच पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल केला आहे.

तक्रारदार महिला असून वकीलही असल्याने पोलीस याप्रकरणी गंभीर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलगी गेल्या गुरुवारी कोर्ट परिसरातील एका शॉपिंग सेंटरच्या महिला स्वच्छतागृहात गेली होती. त्यावेळी महिलांच्या स्वच्छतागृहात एक व्यक्ती उपस्थित होता.

वकिल महिलेने त्या व्यक्तीला विचारले की, तो महिलांच्या शौचालयात काय करतो, तो तरुण घाबरला आणि त्याने तेथून पळ काढला.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने तो तरुण पुन्हा शौचालयात घुसला आणि तिचा विनयभंग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *