मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडातील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात येणार
मुंबई दि.०६ :- मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा ‘एमएमआरडीए’ ला हस्तांतरीत करण्याचा तसेच राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन साठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
केंद्राच्या विविध कंपन्यांना मालमत्ता हस्तांतरण दस्तांवर मुद्रांक शुल्कात संपूर्ण सवलत
मुंबई मेट्रो टप्पा-४ ४ अ, १० आणि ११ या मेट्रो मार्गांसाठी मौजे मोघरपाडा येथे सर्वे नं.३० मधील १७४.०१ हेक्टर क्षेत्र एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येईल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक जमीन संपादनाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.