सामान्य

वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईत ‘रात्रीची खाद्यजत्रा’

मुंबई, दि. ७
मुंबईच्या काही विभागातील वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद सर्वाना घेता यावा यासाठी स्टॉल्स किंवा गाड्यांना परवानगी देऊन मुंबईत रात्रीची खाद्यजत्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री यांनी दिली.

शहर जिल्हा नियोजन मंडळाच्या झालेल्या बैठकीत या निर्णयासह ३६० कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीसह इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, असे केसरकर यांनी सांगितले.

ज्या विभागात वाहतुकीची समस्या नाही तिथे अन्य बाबींची तपासणी करून खाद्यजत्रेसाठी रस्ते, पदपथ किंवा त्यालगत स्टॉल, छोटेखानी ‘फूड मॉल्स’ला परवानगी देण्याचा विचार आहे.

याबाबत विभाग निश्चित करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापालिकेस देण्यात आल्या आहेत, असे केसरकर म्हणाले.

या रात्र खाद्यजत्रेत मालवणी, कोळी आदी विविध खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मुंबईकरांना आणि पर्यटकांना घेता येणार आहे. वरळी, माहीम आणि कुलाबा कोळीवाडय़ातही काही ठिकाणी मासे सुकविण्याच्या जागेत मासे आणि कोळी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेता येईल, अशा पद्धतीने काही जागा विकसित करण्यासाठी निधी देण्यात आला असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *