Thursday, August 20, 2026
Latest:
वाहतूक दळणवळण

Kalyan Traffic : मोटार वाहन कायद्याचे नियम धुडकाविणा-या ४९३ वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई

पाच लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल
कल्याण, दि. २७
वाहतुकीचे नियम धुडकावून वाहने चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत वाहतूक पोलिसांनी ४९३ वाहन चालकांवर कारवाई करुन पाच लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कल्याण वाहतूक विभागाने शहरातील दुर्गाडी, खडकपाडा चौक, गंधारे पूल, शिवाजी चौक, लालचौकी, अंतर्गत रस्ते भागात वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे.
शिरस्त्राण न घालणे, आसन पट्टा न लावणे, भ्रमणध्वनीवर बोलत वाहन चालविणे, दुचाकीवरुन तीन जणांनी प्रवास करणे, रिक्षा चालकांनी गणवेश न घालता वाहन चालविणे या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *