महाराष्ट्र, पंजाबचे देशासाठी मोठे योगदान- राज्यपाल बैस पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट

मुंबई दि.०९ :- पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये अध्यात्मिक व सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे भगिनी राज्ये आहेत. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये दोन्ही राज्यांचे योगदान खूप मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित ‘युवा संगम’ उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र भेटीवर आलेल्या पंजाबमधील ४५ युवक -युवतींनी मंगळवारी राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

गोराई जेट्टी आणि समुद्र किनाराही सुशोभित होणार

संत नामदेव महाराष्ट्रातून पंजाबला गेले व भक्तिमार्गाचा पुरस्कार केला तर शिखांचे दहावे गुरु गोबिंद सिंग यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे वास्तव्य केले. आज महाराष्ट्र व पंजाब या दोन्ही राज्यांमधील सर्वाधिक युवक सैन्यदलामध्ये भरती होतात. महाराष्ट्राच्या विकासात देखील राज्यातील पंजाबी बांधव मोठे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात पहिल्यांदा येऊन खूप आनंद झाला व येथून परत जाऊच नये असे वाटते. मात्र येथे उन्हाळा फार जास्त आहे, असे पंजाब मधून आलेल्या एका युवतीने सांगितले. महाराष्ट्रातील पुरणपोळी, श्रीखंड व शिरा खूप आवडल्याचे एका युवकाने सांगितले.

वाशी-स्वारगेट मार्गावर डिझेलवर धावणारी शिवनेरी सुरू

राज्यपालांशी झालेल्या चर्चेनंतर युवकांनी राजभवनाला भेट दिली. यावेळी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रो. टी.जी सीताराम, आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. सुभासिस चौधरी, ‘युवा संगम’चे निमंत्रक प्रो. मंजेश हनावल, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार सुरेंद्र नाईक, आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार गणेश भोरकड़े, पंजाब येथून आलेले शिक्षक समन्वयक, आयआयटीच्या जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी बॅनर्जी नाहा आदि उपस्थित होते.

कर्जत-खोपोली फेऱ्या आजपासून तीन दिवस रद्द

‘युवा संगम’ उपक्रमांतर्गत पंजाबमधील युवकांना महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, विकास व औद्योगिक प्रगती यांची झलक दाखवली जाणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील ३५ व दादरा नगर हवेली दमण – दिऊ येथील १० युवक देखील पंजाबला भेट देत आहेत. महाराष्ट्राला भेट देत असलेल्या पंजाब मधील युवकांचे पालकत्व ‘आयआयटी’ मुंबई करीत आहे.

rajesh

Recent Posts

कल्याण में धूमधाम से मनी महाराजा अग्रसेन जयंती

कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…

1 month ago

कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, सात आरोपींना अटक

कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…

1 month ago

रासरंग २०२५: डोंबिवलीत शारदीय नवरात्रोत्सवाचा थाटामाटात होणार शुभारंभ

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…

1 month ago

१७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंतीला राष्ट्रीय श्रमिक दिन घोषित करण्याची मागणी

सचिन शिंदे  मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…

1 month ago

डोंबिवली नागरी सहकारी बँकेला (DNS Bank) तिसऱ्यांदा सन्मान

सचिन शिंदे  मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…

2 months ago

दादरमध्ये ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन मुख्य आकर्षण

  मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…

2 months ago