कर्जत-खोपोली फेऱ्या आजपासून तीन दिवस रद्द
मुंबई दि.०९ :- कर्जत यार्ड सुधारणेसाठी आजपासून तीन दिवस (९ ते ११ मे) या कालवधीत विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत-खोपोली फेऱ्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद
अप, डाऊन आणि मिडल मार्गावर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालवाधीत यांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.
ब्लॉक कालावधीत कर्जतहून दुपारी १२ आणि १.१५ वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि खोपोलीहून सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४०ची कर्जत लोकल फेरी रद्द करण्यात आल्या आहेत.