गोराई जेट्टी आणि समुद्र किनाराही सुशोभित होणार
मुंबई दि.०९ :- मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत गोराई जेट्टी आणि समुद्र किनारा यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. जेट्टी आणि समुद्र किनारा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार असून बृहन्मुंबई महापालिका त्यावर दोन कोटी ६९ लाख रुपये खर्च करणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत.
वाशी-स्वारगेट मार्गावर डिझेलवर धावणारी शिवनेरी सुरू
१६ विविध प्रकारची कामे या सुशोभिकरणांतर्गत केली जाणार आहेत. यात सुविधा शौचालय, मियावाकी वृक्ष लागवड, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभिकरण, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण याचा समावेश आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ५०० तर दुसऱ्या टप्प्यात ३२० आणि इतरही अतिरिक्त अशी एकूण १ हजार ०७७ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी ६१३ कामे पूर्ण झाली आहेत.
कर्जत-खोपोली फेऱ्या आजपासून तीन दिवस रद्द
उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती देखील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विशेषतः पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करावीत, विद्युत रोषणाईसंबंधी कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केली. दरम्यान गोराई जेट्टी आणि समुद्र किनारा सुशोभिकरण कामासाठी २ कोटी ६९ लाख रुपये खर्च येणार आहे.