ठळक बातम्या

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींहून अधिक रुपयांची मदत

मुंबई दि.११ :- राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आणि परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. २८ जिल्ह्यांना एकूण १७७.८० कोटींचा निधी देण्यात आला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मार्च महिन्यातील भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात लवकरच जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट सुद्धा करण्यात आले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *