ठाणे – नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी
ठाणे दि.३० :- ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
हिंदूंच्या धार्मिक कृत्यांवर गदा आणणारा जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा – हिंदू जनजागृती समितीची मागणी
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सकाळीच ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून महामार्गाची पाहणी केली.
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक
ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ मास्टिक पद्धतीने बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रकाश पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीएचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी यावेळी उपस्थित होते.
