ठळक बातम्या

आधी स्टेशन परिसरातील बेकायदेशीर फेरीवाले हटवा, मग आम्हाला कायद्याच्या बाता सांगा!” – अविनाश जाधव यांचा प्रशासनाला इशारा

डोंबिवली: मराठी तरुणांच्या व्यवसायाला वारंवार लक्ष्य करणाऱ्या पालिका प्रशासनाला मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज डोंबिवलीत कडक शब्दांत सुनावले. “डोंबिवली स्टेशन परिसरात शेकडो बेकायदेशीर परप्रांतीय फेरीवाले बसतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. मग केवळ मराठी तरुणांनाच कायद्याचा धाक का दाखवला जातो? आधी त्यांना हटवा, मग आम्हाला कायद्याने वागायला सांगा,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासकीय दुजाभावावर तोफ डागली.

मराठी उद्योजिकेच्या पाठीशी मनसे खंबीर

डोंबिवलीतील शोरमा स्टॉल चालवणाऱ्या एकता सावंत या मराठी तरुणीवर पालिकेने कारवाई केल्यानंतर हा वाद पेटला होता. एकताने अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर खुद्द राज ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. आज एकताच्या नवीन शोरमा स्टॉलचे उद्घाटन करताना अविनाश जाधव यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वादाच्या भोवऱ्यात: ‘पार्टी विथ डिफरन्स’ची नैतिक घसरण की सत्तेसाठी हपापलेपण

अविनाश जाधव यांची आक्रमक भूमिका:

* पक्षपाती कारवाई: “स्टेशनपासून १५० मीटरच्या आत नियम लावले जातात, पण हे नियम फक्त मराठी लोकांसाठीच आहेत का? तिथे बसणाऱ्या हजारो परप्रांतीय फेरीवाल्यांना प्रशासन का अभय देते?” असा सवाल त्यांनी केला.

* मराठी टक्का टिकवणार: मराठी मुलांनी उद्योगात उतरावे ही राज साहेबांची इच्छा आहे. जर त्यांच्या व्यवसायावर विनाकारण गदा येणार असेल, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

* प्रशासनाला आव्हान: जोपर्यंत स्टेशन परिसरातील सर्व बेकायदेशीर फेरीवाले हटवले जात नाहीत, तोपर्यंत मराठी तरुणांच्या स्टॉलला हात लावून दाखवावा, असे खुले आव्हान त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

महाराष्ट्राने बिहारलाही मागे टाकले! उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलीसांसमक्ष `साम-दाम-दंडा’चा वापर

ती हरली नाही, लढली!’

यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, एकता सावंतने दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे. भाड्याची गाडी सोडून तिने आता स्वतःची नवी गाडी घेतली असून, मनसे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नियमांचे पालन सर्वांनीच केले पाहिजे, पण नियमांच्या नावाखाली केवळ मराठी माणसाची गळचेपी सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आक्रमक भूमिकेमुळे आता कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन बेकायदेशीर फेरीवाल्यांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.