डोंबिवलीत प्रजासत्ताक दिनी रक्तदानाचा ‘प्रगती’ उत्सव; ४५ दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली:
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘निर्मल यूथ फौंडेशन’ आणि ‘प्रगती महाविद्यालय’ (NSS युनिट) यांच्या वतीने डोंबिवलीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुट्टीचा दिवस असूनही डोंबिवलीकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे ४५ रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट रक्तदान पेढी, शब्दखडग, नवशक्ती आणि द फ्री प्रेस जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. संस्थेचे संचालक श्री. जगन्नाथजी पाटील आणि श्री. विष्णू म्हात्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा कु. अक्षता औटी, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. अनुजा बापट आणि यतीन केणे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे, उपप्राचार्य डॉ. कीर्ती बारड, डॉ. ज्योती पोहाणे, नूतन पाटील, लक्ष्मण इंगळे आणि गुरुनाथ पाटील उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाचा सहभाग आणि रक्तदान
या शिबिराचे खास आकर्षण म्हणजे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ भेटच दिली नाही, तर स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला.
* सहायक पोलीस आयुक्त श्री. सुहास हेमाडे
* वरिष्ठ पोलीस निरीक्षक (रामनगर) श्री. गणेश जवादवाड
* वरिष्ठ पोलीस निरीक्षक (विष्णुनगर) श्री. राम नेमाडे
या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक कार्याचे महत्त्व पटवून दिले आणि आयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
प्रायोजक आणि सहकार्य
या उपक्रमाला शब्दखडगचे संपादक श्री. दीपक जाधव व श्री. विलास चव्हाण यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व श्री. अवधेश मिश्रा (युट्युबर) आणि बासरी उद्योग समूह (पारनेर) यांनी भूषवले.
“निर्मल यूथ फौंडेशन आणि प्रगती महाविद्यालयाने एकत्र येत सामाजिक कार्यात आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. तरुणाईचा हा पुढाकार देशाच्या प्रगतीसाठी नक्कीच आश्वासक आहे.”
