Thursday, August 20, 2026
Latest:
धर्म संस्कृती

धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा- अभय वर्तक

डोंबिवली दि. ५
धर्म आचारशील असतो. धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्‍या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळे मनोबल वाढते, आत्मशक्ती जागृत होते. भारताचे रक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक यांनी येथे केले. सनातन संस्थेने डोंबिवली पूर्व येथील शुभमंगल कार्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

जन्महिंदुपेक्षा कर्महिंदू असणे अधिक महत्त्वाचे असून हिंदू धर्मातील सण-उत्सव-व्रत-वैकल्ये धर्मशास्त्राप्रमाणे साजरी केली तर कुटुंबीयांवर धर्मसंस्कार होतील, असेही वर्तक यांनी सांगितले.
अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती साधनमुळेच येते. धर्मसंस्थापना करण्यासाठी आपल्याकडून राष्ट्र आणि धर्मकार्य करण्यासाठी ईश्वराला अभिप्रेत कार्य करण्याची शक्ती केवळ साधनेमुळे मिळू शकते, असे ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते
दुर्गेश परुळकर म्हणाले.

हिंदू राष्ट्र हा एकच पर्याय
ठाणे– हिंदू धर्मावर मोठ्या प्रमाणात होणारे आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हा एकच पर्याय आहे. या हिंदु राष्ट्राच्या कार्यात आपला सहभाग देण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, असे आवाहन हिंदू टास्क फोर्स चे संस्थापक, अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी ठाणे येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.

यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलुगु या सहा भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनीही ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. वेळी सनातन संस्थेच्या मराठी भाषेतील ‘अध्यात्माचे प्रास्ताविक’ या ई-बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

सनातन संस्थेच्यावतीने ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर येथे तसेच संपूर्ण देशभरात ७२ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
भिवंडी
हिंदू राष्ट्र येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अनेक संतांनीही त्याविषयी सांगून ठेवले आहे. काळही त्याच दिशेने जात आहे. त्यामुळे या काळात आपण हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले, तर काळानुसार धर्मकार्य होऊन त्यातून आपली साधना होणार आहे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रसाद वडके यांनी येथे केले.

भिवंडी येथील अखिल पद्मशाली समाज संस्कृती भवन येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ सादर करण्यात आली.

तर भिवंडी येथे अन्य ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ह.भ.प. सुनील भगत म्हणाले, हिंदू राष्ट्र येणारच आहे याची आम्हाला खात्री आहे. सनातन संस्थचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार आपण हिंदूराष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतिशील होऊ या.

दिवा
येथील गुरुपौणिमा महोत्सवात अधिवक्ता संतोष दुबे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपण सर्वांनी ‘हिंदू राष्ट्र’ या विचाराने एकत्र येऊन धर्मावरील आघात रोखण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

वाशिंद
प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे आवश्यक असून छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसारखी धमक आपल्या सर्वांमध्ये यायला हवी. धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्र हवे असेल तर आपण सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे शंभूदुर्ग प्रतिष्ठानचे महासचिव आणि शिवचरित्रकार संजय चौधरी यांनी सांगितले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *