शैक्षणिक

दहावीचा उद्या निकाल

मुंबई, दि. १
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार, २ जून) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत झाली होती. यंदा १५ लाख ७७ हजार २२२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
दुपारी एक नंतर mahresult.nic.in, https://ssc.mahresults.org.in,
http://sscresult.mkcl.org या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *