ठळक बातम्या

मुंबईतील मुद्रांक विक्रेते उद्या संप मागे घेणार

मुंबई दि.१० :- गेल्या नऊ दिवसांपासून संपावर गेलेले मुंबईतील मुद्रांक विक्रेते उद्या मंगळवारपासून संप मागे घेणार आहेत. मुद्रांक खरेदीसाठी स्वतः मुद्रांक विक्री दुकानात न जाता त्यांच्या प्रतिनिधीला मुद्रांक देण्याची परवानगी देण्याचे आश्वासन मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने दिल्यामुळे हा संप मागे घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

आणि ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी कोलू फिरविण्याचा अनुभव घेतला

मुंबईतील अप्पर मुद्रांक कार्यालयाने २१ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढून मुद्रांक खरेदी करण्यासाठी वैयक्तिक हजर राहून नोंदवाही सही करणे बंधनकारक केले. त्यामुळे वृद्ध नागरिक, अपंग, रुग्णांसाठी हा नियम अडचणीचा ठरला. हा आणि अन्य काही नियम रद्द व्हावेत यासाठी मुंबईतील मुद्रांक विक्रेते एक एप्रिल पासून संपावर गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *