पोललीस स्मृती दिन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
पोललीस स्मृती दिन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
मुंबई:
देशसेवा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. नायगाव, मुंबई येथील पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या रक्षणासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस दलाच्या शौर्याचे स्मरण केले तसेच हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दिल्लीत विरोधकांच्या अराजकतेमुळे व्यवसाय ठप्प: विनोद तावडे यांचा तीव्र शब्दांत हल्लाबोल
या स्मृती दिन कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी (डप्लोमॅट्स) आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

