बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के
कोकण विभागाची बाजी, निकाल ९६.०१ टक्के
मुंबई, दि. २५
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला आहे.
गेल्यावर्षी राज्याचा निकाल ९२.२२ टक्के होता. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८. १३ टक्के आहे.
यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. संपूर्ण राज्यभरातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
आज सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात आला.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल आणि विभागनिहाय टक्केवारी जाहीर करण्यात आली.
गुणपडताळणीसाठी २६ मे ते ५ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
——–